कोल्हापुरात तुफान पाऊस... पंचगंगेची झाली 'मछिंद्री'!

कोल्हापूर जिल्ह्यात पुरस्तिथी गंभीर बनलीय

Updated: Jul 18, 2018, 01:17 PM IST
कोल्हापुरात तुफान पाऊस... पंचगंगेची झाली 'मछिंद्री'! title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ४४ फूट इतकी आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहतेय. त्यामुळे पंचगंगा नदीची मछिंद्री झाली आहे.. आता मछिंद्री झाली म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. याबद्दलच सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक... 

कोल्हापूर जिल्ह्यात पुरस्तिथी गंभीर बनलीय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम म्हणून पंचगंगा नदीनं धोका पातली ओलांडलीय. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५ राज्य मार्ग बंद झालेत तर १५ हून अधिक जिल्हा मार्गांवर पाणी आहे. कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी घुसलंय. यामुळे प्रशासनानं परिसरातल्या कुटुंबांचं स्थलांतर केलंय. रात्रीपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी ८ इंचानं वाढली आहे. जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेलेयत.
 
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहरातल्या सखल भागातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.