Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे इतके वर्षांचे राजकारण फुकट, असं का म्हणाले संजय राऊत...

Sanjay Raut : मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा ( Maha Vikas Aadhadi Morcha) काढण्यात आला. याला देवेंद्र फडणवीस यांनी 'नॅनो मोर्चा' म्हटले होते. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: Dec 18, 2022, 11:00 AM IST
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे इतके वर्षांचे राजकारण फुकट, असं का म्हणाले संजय राऊत... title=

Sanjay Raut on Devendra Fadnavis : मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा ( Maha Vikas Aadhadi Morcha) काढण्यात आला. (Maharashtra News in Marathi) याला मोठा प्रतिसाद मिळाला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या MVAच्या मोर्चाला 'नॅनो मोर्चा' म्हटले होते. (Political News) याला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Political News) फडणवीस हे इतके वर्ष राजकारणात आहेत. मात्र, त्यांना भव्य मोर्चा दिसला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही. हेच वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्याने केले असते तर समजू शकलो असतो. कारण त्यांची बुद्धी नॅनो आहे, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी विरोधी पक्षातही प्रदीर्घ काम केले आहे. त्यामुळे त्यांचे इतके वर्षांचे राजकारण फुटक, अशी टीका राऊत यांनी केली.

'भव्य मोर्चा देवेंद्र फडणवीस यांना दिसला नसेल'

राऊत पुढे म्हणाले, मुंबईत काढण्यात आलेला भव्य मोर्चा देवेंद्र फडणवीस यांना दिसला नसेल, तर दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेले दिसत आहे. ही त्यांची गुंगी अद्यापही उतरलेली नाही, असे म्हणत फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. कालच्या मोर्चावर फडवणीस यांनी टीका केली होती. ज्यांना स्वत:चं सरकार टीकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केलं, हे सरकार टिकणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) रहाणार, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणूक लढवणार आणि पुन्हा आमचंच सरकार या महाराष्ट्रात येणार असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होती. 

मुळात हा मोर्चा राजकारणासाठी नव्हता, तर...

आपण सर्व (पत्रकार) मोर्चाला होता, फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांची बुद्धी नॅनो आहे. मधल्या काळात ते दिल्लीला गेलेले होते. त्यावेळी त्यांना गुंगीचे औषध दिले असेल. मुळात हा मोर्चा राजकारणासाठी नव्हता, हा मोर्चा महापुषांसाठी होता. फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना करु नका. ज्यांनी महाराष्ट्राचे राजकारण केले ते पाचोल्यासारखे उडून गेले. हा सूर्यावर धुंकण्याचा प्रकार, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

'उदयनराजे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे'

शिंदे - फडणवीस यांना जनता जागा दाखवणार. मुंबई शिवसेनेचा जास्त पगडा असल्यामुळे तिथे सेनेचे झेंडे दिसणारच. दिल्लीत गेल्यावर त्यांना इंजेक्शन दिले जाते ते गुंगाराम आहेत. छत्रपती उदयनराजे यांच्या भूमिकेचे शिवसेनेने समर्थन केले आहे. उदयनराजे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नॅनो गाडीचे प्रोडक्शन बंद झाले आता हे सरकरकरही लवकरच कोसळणार, असा पुनरउच्चार संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे अधिवेशनाला जाणार आहेत, असे सांगत एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री आहेत. त्यांची साताऱ्यात दोन हेलिपॅड आहे, असे म्हटले.