राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर, कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठा निर्णय

ITIs Name Changes: आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 23, 2024, 03:53 PM IST
राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर, कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठा निर्णय title=
राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर

ITIs Name Changes: राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात येणार आहे.कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केलाय.आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे ते म्हणाले.ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आले आहे.

कोणत्या संस्थांच्या नावात बदल?

कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारितील पुढील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावांमध्ये बदल करण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई -1, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि. बीड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव यांचा समावेश आहे.   

काय आहेत बदललेली नावे?

नव्याने करावयाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण पुढीलप्रमाणे असेल.  धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर, कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि.बीड, भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर, महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक, राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली, कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा,दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई,महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई,आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे.