महाराष्ट्रात २२ जिल्हे आणि ४९ नव्या तालुक्यांचा प्रस्ताव

 राज्यात नवे २२ जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव 

Updated: Jan 28, 2020, 09:36 PM IST
महाराष्ट्रात २२ जिल्हे आणि ४९ नव्या तालुक्यांचा प्रस्ताव

मुंबई : तुमचं शहर जिल्हा होणार की तालुका ? असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर अचंबित होऊ नका..कारण असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१८ मध्ये यासंदर्भातील अभ्यास करण्यात आला होता. त्यामुळे राज्यात नवे २२ जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 

ठाण्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण, पालघरमधून जव्हार, रत्नागिरीतून मानगड, रायगडमधून महाड हे जिल्हे होण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर, गडचिरोलीतून अहेरी, जळगावातून भुसावळ, लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नांदेडमधून किनवट, साताऱ्यातून माणदेश तर पुण्यातून शिवनेरी हे जिल्हे होण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे.

याप्रकणी भाजप सरकारच्या कार्यकाळात एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जिल्हे निर्मितीच्या सर्व बाबी तपासून पाहील्या.

प्रस्तावित जिल्हे 

पालघर - जव्हार
ठाणे - मीरा-भाईंदर आणि कल्याण
रत्नागिरी - मानगड
रायगड - महाड
अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
नाशिक - मालेगाव आणि कळवण
बीड - अंबेजोगाई
नांदेड - किनवट
सातारा- माणदेश
पुणे - शिवनेरी
बुलडाणा - खामगाव
यवतमाळ - पुसद
अमरावती - अचलपूर
भंडारा - साकोली
चंद्रपूर- चिमूर
गडचिरोली-  अहेरी
जळगाव- भुसावळ
लातूर - उदगीर