'या' जिल्ह्यात 30 विद्यार्थी-शिक्षकांना कोरोना, शाळा-महाविद्यालये बंदचे आदेश

नांदोर (Nandore) येथील विद्यार्थी आणि आश्रम शाळेच्या (Ashram Shala) शिक्षकांसहित 30 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे.  

Updated: Mar 18, 2021, 11:12 AM IST
'या' जिल्ह्यात 30 विद्यार्थी-शिक्षकांना कोरोना, शाळा-महाविद्यालये बंदचे आदेश title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यातील नांदोर (Nandore) येथील विद्यार्थी आणि आश्रम शाळेच्या (Ashram Shala) शिक्षकांसहित 30 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे पालघर (Palghar) जिल्हा प्रशासनाने शाळा, वसतिगृह सील केले आहे. दरम्यान, पुढील आदेश होईपर्यंत पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाल यांनी दिली. (Palghar Collector Dr Manik Gursal)

राज्यात 24 तासांत कोरोनाचे 23 हजार 159 रुग्ण सापडलेत. तर 84 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत २३७७, नागपुरात ३३७० रुग्ण आढळलेत. मंगळवारी 17 हजारांवर रुग्ण होते. एका दिवसात तब्बल सहा हजारांनी रुग्ण वाढलेत. 

कोरोना रोखण्यासाठी मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घातलीय.पण कामासाठी भेट देणा-यांची गर्दी आहेच. रोज तीन ते चार हजार नगरीक मंत्रालयात येतात. त्यात राजकीय कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी २३ मार्चला सामान्यांना बंद केलेला प्रवेश जानेवारीपासून सुरु केला. 

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. चार दिवसात जिल्ह्यात रुग्णांची संख्या हजार पार गेली आहे. चार दिवसात 1327 रुग्णांची भर पडलीय. यामुळे टेस्ट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात दिवसाला 2500 पेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्य आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरच्या सर्वांच्या सरसकट लसीकरणाची मागणी पंतप्रधानांकडे केली. राज्यातला लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.. पंतप्रधानांनी व्हिसीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. 

भारत बायोटेकनं लस तयार करण्याचं तंत्रज्ञान हाफकिन इन्स्टिट्युटला द्यावं, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केलीय. महाराष्ट्रातच लस तयार होईल, त्यातलं २५ टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळावं, तसंच दर आठवड्याला २० लाख लसींचा पुरवठा करा, अशी मागणीही टोपेंनी केलीय.