close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नक्षलप्रभावी गडचिरोलीचं मतदान पूर्ण

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरु आहे

Updated: Oct 21, 2019, 04:13 PM IST
नक्षलप्रभावी गडचिरोलीचं मतदान पूर्ण

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरु आहे, असं असलं तरी ३ वाजता गडचिरोली जिल्ह्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोलीमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार होतं. १ वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये सरासरी ५०.८७ टक्के मतदान झालं आहे. पुढच्या काही वेळामध्ये गडचिरोलीतल्या मतदानाची अंतिम आकडेवारी येईल. पण गडचिरोलीमध्ये ६० ते ६५ टक्के मतदान व्हायचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीमध्ये अंदाजे ७० टक्क्यांपर्यंत मतदान झालं होतं. गडचिरोलीचा भाग संवेदनशील असल्यामुळे ५ हेलिकॉप्टर लावून मतदान पथकांना वेगवेगळ्या २० कॅम्पपर्यंत पोहोचवण्यात आलं. यानंतर ही मतदान पथक चालत किंवा छोट्या वाहनांनी आपल्या मतदान केंद्रापर्यंत आली.