Bhai Jagtap on Election Commission : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीची दारुण पराभव झालाय. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीला हा पराभव पचनी पडत नाहीय. अशात काँग्रेसकडून सातत्याने एमव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. याच प्रकरणात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरलीये.
निवडणूक आयोगावर टीका करताना जगताप म्हणाले की, ' इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचं असा व्यवहार करत आहेत.' या शब्दात भाई जगताप यांनी वादाला तोंड फोडलंय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केलीये. (maharashtra assembly election-2024 congress mla bhai jagtap enomous comment on election commission has turned into a dog and is sitting at modis door)
मात्र काँग्रेस नेते भाई जगताप त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितलंय. जगपात म्हणाले की, 'निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही. आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली. मी माझ्या विधानावर ठाम आहे. टीएन शेषण यांनी ज्याप्रकारे काम केले, तसंच काम करण्याची आता गरज आहे.'
#WATCH | Mumbai, Maharashtra: On his "kutta" remark for Election Commission, Congress leader Bhai Jagtap says, "I will not apologise at all, not even a bit...If they are working under pressure from the PM and other ministers then what I have said is right. I will not… pic.twitter.com/xmJ9cfUgas
— ANI (@ANI) November 29, 2024
दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसतात. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं असल्याने त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार असल्याची टीका दरेकर यांनी भाई जगताप यांच्यावर केलीय.