Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या विधनसभा निवडणुकीत चर्चा झाली ती कोट्याधीश उमेदवारांची. निवडणुकीच्या निकालानंतर चर्चेत आले ते कोट्याधीश आमदारांची. या कोट्याधीश आमदारांसह चर्चा झाली ती महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदाराची. तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार कोण? महाराष्ट्रातील या सर्वात गरीब आमदाराकडे फक्त 51 हजारांची संपत्ती आहे. या आमदाराने भाजपच्या तगड्या उमेदवाराचा दोनदा पराभव केला आहे. जाणून घेऊया हा आमदार कोण?
महाराष्ट्रातील या सर्वात गरीब आमदाराचे नाव आहे विनोद भिवा निकोले. विनोद भिवा निकोले हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार आहेत. विनोद भिवा निकोले यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवणूक लढवली. विनोद निकोले 72114 मतांनी विजयी झाले आहेत. भाजप उमेदवार धनारे पास्कल जन्या यांचा त्यांनी परभव केला. धनारे पास्कर जन्या यांना 67407 मते मिळाली.
2019 साली निकोले यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. निकोले हे भूमिहून आदिवासी मजूर कुटुंबातून येतात. 2019 मध्ये त्यांनी लोकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतिज्ञापत्र सादर करतात. शपथपत्रानुसार निकोले यांच्याकडे घर, गाडी काहीही नव्हते. त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे नाही. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे फक्त 51 हजार 82 रुपयांची संपत्ती आहे. निकोले हे समाजसेवक आहेत.तर, त्यांच्या जोडीदार या शिक्षिका आहेत.
गीता जैन (अपक्ष आमदार)
2019 - 70.44 कोटी
2024 - 392.30 कोटी
पराग शहा (भाजप)
2019 - 500.62 कोटी
2024 - 3383.06 कोटी
राहुल नार्वेकर (भाजप)
2019 - 38.09 कोटी
2024 - 129.81 कोटी
प्रताप सरनाईक (शिवसेना)
2019 - 143.97 कोटी
2024 - 333.32 कोटी
तानाजी सावंत (शिवसेना)
2019 - 194.5 कोटी
2024 - 218.1 कोटी
दीपक केसरकर (शिवसेना)
2019 - 59.70 कोटी
2024 - 98.50 कोटी