महाराष्ट्रातील जनतेला नविन वर्षात मोठा झटका बसणार? एसटीचा प्रवास महागणार? तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

ST Bus : नविन वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.  तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 1, 2024, 06:26 PM IST
महाराष्ट्रातील जनतेला नविन वर्षात मोठा झटका बसणार? एसटीचा प्रवास महागणार? तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव title=

ST Bus Ticket Price Hike : महाराष्ट्रातील जनतेला नविन वर्षात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. नविन वर्षात एसटी बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळानं तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास एसटीची भाडेवाढ होणार आहे. महायुती सरकार या प्रस्ताव मान्य करणार की सर्वसामान्यांना दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; सातपुडा पर्वतात रांगेतील छुपं पठार, खास सुर्योदय पाहण्यासाठी येतात पर्यटक

लालपरी ही सर्वसान्यांचे हक्काचे वाहन आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटीची सेवा उपलब्ध आहे. यामुळे ग्रामीण भागातील 80 ते 90 टक्के प्रवासी एसटीबसने प्रवास करतात.  सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन असलेल्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत एसटी महामंडळानं तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शंभर रुपयांमागे 15 रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यानं महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे.

 गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात; 10 प्रवाशांचा मृत्यू 

गोंदियातील सडक अर्जुनी मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर बसमधील 30 ते 35 प्रवासी जखमी आहेत. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने 10 लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिलेत.