'आधी भावाला...', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं...'

Maharashtra Assembly Election: जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा अशी टीका रितेश देशमुखने भाजपावर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Nov 11, 2024, 08:04 PM IST
'आधी भावाला...', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं...' title=

Maharashtra Assembly Election: जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा अशी टीका रितेश देशमुखने भाजपावर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. रितेश देशमुख धर्माबद्दल जे बोलले, ते त्यांनी त्यांच्या भावाला सांगायला हवं होतं अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेसने नेहमीच जातीचं राजकारण केलं अशी टीकाही केली आहे. 

रितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, 'मविआचं सरकार येणार, धर्म बचाओ सांगणाऱ्यांना...'

 

 राहुल शेवाळे म्हणाले की, "रितेश देशमुख धर्माबद्दल जे बोलले ते त्यांनी त्यांच्या भावाला आधी सांगायला हवं होतं. काँग्रेसच जातीपाती व धर्माचे राजकारण करते. लोकसभेला जातीच्या आधारावर फेक नरेटिव्ह काँग्रेसने तयार करून मतं मागितली होती. त्यांनीच नेहमी जातीचं राजकारण केलं आहे". संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या 160 ते165 जागा महाविकास आघाडीच्या येतील असं सांगितलं आहे. संजय राऊत जे काही बोलतात ते कधीच होत नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 

रितेश देशमुख नेमकं काय म्हणाले?

"कृष्ण म्हणाले होते कर्म हाच धर्म आहे. जो काम करतो प्रामाणिकपणे त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो. पण जे काम करत नाहीत त्यांना गरज पडते धर्माची! सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा धर्म बचाओ. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा," असा टोला रितेशने लगावला. लातूरमधील ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यानित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलताना त्याने हे विधान केलं. 

"आता विधानसभेला आपलं झापूक-झुपूक वारं आहे. येत्या 20 तारखेला तुम्ही जे बटण दाबणार आहात ते असं दाबा कि त्यांचे पुढच्या वेळचे डिपॉझिट आत्ताच जप्त झाले पाहिजे. आता जे विरोधक आहेत भाजपा आमदार रमेश कराड ते पण सध्या आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या बटणाची गरज नाही," अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुख यांनी लातूर ग्रामीणचे भाजपा आमदार तथा उमेदवार रमेश कराड यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. "अमित आणि धीरज इथं एक नंबर आणि आम्ही जिथे आहोत तिथे बरं आहोत," असंही रितेश देशमुख यांनी म्हटलं आहे.