उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? मनसेचा सवाल; राज ठाकरेंचं 'ते' पत्र चर्चेत

Maharashtra Assembly Election Raj Thackeray MNS Allegation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरामध्ये एकूण 138 उमेदवार उभे केले आहेत. त्यातही मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 21, 2024, 12:32 PM IST
उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? मनसेचा सवाल; राज ठाकरेंचं 'ते' पत्र चर्चेत title=
मनसेचा गंभीर दावा (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Assembly Election Raj Thackeray MNS Allegation: विधानसभेसाठीचं मतदान बुधवारी पार पडलं. या मतदानानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काही गंभीर आरोप केले आहेत. मतदानाच्या एक दिवस आधीच वरळीमधील तिरंगी लढतीदरम्यान राज ठाकरेच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध झाल्याने एकच गोंधळ उडाला. या पत्रामध्ये राज ठाकरेंनी वरळीमध्ये 'धनुष्यबाणा'ला समर्थन दिल्याचे नमूद करण्यात आलेलं. यावर राज ठाकरेंची स्वाक्षरीही दिसत असल्याने अनेकांचा संभ्रम झाला. म्हणूनच या प्रकरणामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी थेट अघ्नीपाडा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला. मात्र आता याच प्रकरणावरुन थेट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वरळीमध्ये तरी छुपी युती होती का? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

लाडके भाऊ चिटर

घडलेल्या प्रकरणामध्ये बोलताना मनसेचे वरळीचे उमेदवार संदीप देशपांडेंनी मुद्दाम हे खोटं पत्र व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. "शिवसेना शिंदे गटाने एक उमेदवार उभा केला मिलिंद देवारा! मत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने खोटं पत्र वायरलं केलं. या लाडक्या बहिणींचे हे लाडके भाऊ चिटर आहेत. मिलिंद देवरा यांच्यावरही गुन्हा दाखवायला हवा. राजेश कुथळे हे दत्ता नरवणकरांचे पदाधिकारी आहेत," असं संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल होत असणारं पत्र खोटं असल्याची पोस्ट आपल्या एक्स (आधीचं ट्वीट) अकाऊंटवरुनही केली आहे. 

ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे गट आणि ठाकरे गटाने संगनमताने हे खोट्या पत्राचं नाट्य घडवलं का असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे. मनसे किंग मेकर हे 48 तासाने कळेल. पण मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? असा प्रश्न आहे. या वेळेची निवडणूक मनसेसाठी अत्यंत महत्वाची तितक्याच त्वेशाने लढलो, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?

डाव हाणून पाडला

"ठाकरे गटाने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत केलं होतं. त्यांचे काय व्यवहार झाले असतील, मला माहित नाही. दोघांनाही माहित होतं की आपण चालत नाही आहोत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा डाव होता. दोघेही पोलिस स्टेशनला जातील, मारामाऱ्या होतील हा त्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. त्यामुळे वरळीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी संगनमत केलेलं मनसेला हरवण्यासाठी. मात्र हा जनतेनं त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे," असा दावा संदीप देशपांडेंनी केला आहे.

शिंदेंचा प्रचंड दबाव

मतदानासाठी उदासिनता का? हे सर्व राजकिय पक्षांनी समजायला हवं. लोकांनी स्थानिक प्रश्नांना अनुसरून मतं दिलेली आहेत. वाढलेल्या मतांचा फायदा भाजपलाच का? मनसेलाही होऊ शकतो. शिंदेंचा प्रचंड दबाव होता, निवडणूक अधिकाऱ्यांच्या निरीक्षकांनी सांगितल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती संदीप देशपांडेंनी दिली.