Maharashtra Assembly Elections 2024 : महायुतीत नऊ आकड्याची नऊलाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत जे जागावाटप होणार आहे ते जागावाटपात नऊ आकड्याचं सूत्र असणार आहे. भाजपनं जी उमेदवारी यादी जाहीर केलीय. ती यादीही 99 उमेदवारांची आहे. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला ज्या जागा देऊ करण्यात आल्यात त्याचीही गोळाबेरीज 9 येत असल्याचं सांगितलं जातंय. महायुतीला नऊ या आकड्यानं भुरळ घातली की काय अशी चर्चा राज्यभरात सुरु झालीय.
महायुतीच्या जागावाटपाकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जागावाटप करताना महायुतीचे नेते शुभ आकड्यांना महत्व देत असल्याची चर्चा सुरु झालीय. महायुतीनं त्यांचा शुभ आकडा 9 मानल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. महायुती जागावाटप करताना भाजप स्वतः आणि मित्रपक्षांच्या जागांची गोळाबेरीज 9 येईल याची खबरदारी घेतलेली दिसतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटपात भाजप 162 जागा स्वतःकडे घेणार आहे. 1+6+2= 9 मूलांक येतोय. शिवसेना 72 जागा लढवणार आहे 7+2 = 9 मूलांक येणार आहे. राष्ट्रवादी 54 जागा लढवणार अशी माहिती आहे 5+4=9 गोळाबेरीज होते. सर्वाधिक जागा भाजपनं स्वतःकडं ठेऊन शिवसेनेला 72 आणि राष्ट्रवादीला 54 जागा देऊ केल्याची माहिती समोर येतेय. हा जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना मान्य होणारा नाही. पण जागा वाढवून शुभांक आणि मूलांक 9 येईल अशा बेतानं जागा पदरात पाडून घेतील का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत...कुडाळची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे...त्याआधी नारायण राणे यांनी काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली त्यानंतर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली...आज पुन्हा नारायण राणेंनी फडणवीसांची भेट घेतलीये...