Maharashtra Budget 2023: यंदाच्या राज्य सरकारच्या बजेटमधून रेल्वे विभागासाठीही (Railway Budget 2023) मोठी तरतूद करण्यात आली आहे. आज दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांनी बजेटची घोषणा करायला सुरूवात केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून एकूण 13000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत या बजेटमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड (Kalyan Murbad Railway Marg) रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या मार्गावरून आता अनेकांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यातून रेल्वेसाठी राज्य सरकारकडून याशिवाय अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. तेव्हा जाणून घेऊया की यंदाच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारकडून रेल्वेच्या अर्थसंकल्पातून नक्की काय काय पडलं आहे. (Maharashtra Budget 2023 new annoucements for railway by state government kalyan to murbad railway route has been sanctioned)
महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे मेट्रोचा. यंदाच्या वर्षी पायाभूत सुविधांच्या (Infrastructure) दृष्टीनं अनेक प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक नवे प्रोजेक्ट्स खुले होणार आहेत. चला पाहूया की यंदाच्या अर्थसंकल्पातून मेट्रो प्रकल्पात (Metro Project) काय काय मिळाले आहे.
- मुंबईत (Mumbai Metro) 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
मुंबईतील नवीन प्रकल्प
- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
- नागपूर मेट्रोचा (Nagpur Metro) दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
- पुणे मेट्रो (Pune Metro) : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो
रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण
रेल्वेच्या खिशात आणखी काय काय योजना मिळाल्या आहेत याचीही तुम्हाला कल्पना येईलच. चला पाहूया रेल्वेला यातून कोणत्या नव्या गोष्टी मिळाल्या आहेत? नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देण्याचा संकल्प (Railway Budget) यावेळी घोषित झाला असून सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूलासाठी (Bridge) तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी (Redevelopment) सुमारे 400 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.