2023 maharashtra budget

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

 

Mar 9, 2023, 04:16 PM IST

Maharashtra Budget : सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही - अजित पवार

Maharashtra Budget  : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा चुनावी जुमला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. 

Mar 9, 2023, 03:45 PM IST

Maharashtra Budget 2023: कल्याण-मुरबाड नवा मार्ग, पाहा कसा होईल तुमचा प्रवास सुखकर?

Maharashtra Budget 2023: यंदाच्या बजेटमध्ये (Devendra Fadadnvis) रेल्वेसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमधून नव्या रेल्वे मार्गाला (Railway Budget) मान्यता तर मिळाली आहेच. परंतु त्याचसोबत मोठ्या कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे.

Mar 9, 2023, 03:13 PM IST

Maharashtra Budget 2023: फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून अनेक नव्या घोषणा करत आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी घोषणा केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवत जल्लोष केला. 

 

Mar 9, 2023, 03:02 PM IST

Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

Maharashtra Budget 2023 :   महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. (Health News) तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)

Mar 9, 2023, 02:57 PM IST

Maharashtra Budget 2023: अंगणवाडी सेविकांसाठी नवी 'आशा'; राज्य सरकारकडून मानधनात भरीव वाढ

Maharashtra Budget 2023: राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika) मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 20,000 रिक्त पदभरती सह इतक्या रूपयांची वाढही करण्यात आली आहे. पाहा तुम्ही कसा करू शकता अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika Application) अर्ज? 

Mar 9, 2023, 02:52 PM IST

Maharashtra Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प महिलांचाच... पाहा महिलांसाठी काय झाल्या घोषणा

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर झाला. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा आयपॅडवरून अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाठी बऱ्याच तरतुदी केल्याचं पाहायला मिळालं. 

 

Mar 9, 2023, 02:50 PM IST

Maharashtra Budget 2023: 'गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान' योजनेतून शेतकऱ्यांना काय?

Maharashtra Budget 2023: राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Budget for Farmers) मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना (State Government Benefits for Farmer's Family) मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत 2 लाख रूपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल. 

Mar 9, 2023, 02:40 PM IST

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 :  शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

Mar 9, 2023, 02:30 PM IST

Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला असून आयपॅडच्या (iPad) सहाय्याने बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. 

 

Mar 9, 2023, 02:24 PM IST

Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

Maharashtra Budget 2023: राज्यात 1 लाखांहून अधिक 'लव्ह जिहाद'ची (Love Jihad) प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) दिली आहे. तसंच श्रद्धा वालकरसारख्या (Shraddha Walkar) हत्येच्या घटना पुन्हा होऊ देणार नाही यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

Mar 9, 2023, 02:07 PM IST

Maharashtra Budget 2023: नागालँडमध्ये 50 खोके एकदम ओके झाले का? गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला

Maharashtra Budget Session 2023: नागलँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे पडदास महाराष्ट्रात उमटले आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाने राष्ट्रवादीला या विषयावर घेरलं.

Mar 9, 2023, 12:44 PM IST

Maharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.  

Mar 9, 2023, 11:46 AM IST

Maharashtra Budget : अर्थमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात मांडणार

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार का याची उत्सुकता आहे. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाईल. दुपारी 2 वाजता विधानसभेत बजेट मांडलं जाईल. 

Mar 9, 2023, 08:02 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x