महाराष्ट्रातील १३ जिल्हे हागणदारी मुक्त झाले

नोटाबंदीनंतर आता महाराष्ट्रात लोटा बंदी सुरू झाली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 3, 2017, 09:12 PM IST
महाराष्ट्रातील १३ जिल्हे हागणदारी मुक्त झाले title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : नोटाबंदीनंतर आता महाराष्ट्रात लोटा बंदी सुरू झाली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यातील १३ जिल्हे हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा मंगळवारी केली. मोदींनी देशांत नोटा बंदी आणली. आमच्या खात्यानं राज्यात 'लोटा बंदी' आणली, असा मिश्किल टोला त्यांनी यावेळी लगावला. राज्यातील १७३ तालुके आणि १९ हजार ३०६ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितलं.