Lockdown in Maharashtra : राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन

बुधवारी झालेल्या बैठीत  राजेश टोपे यांनी पुढे लॉकडाऊन वाढवणारचं असे संकेत दिले. 

Updated: Apr 29, 2021, 08:14 PM IST
Lockdown in Maharashtra : राज्यात 15  मेपर्यंत लॉकडाऊन title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता 14 एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्य सरकारने याबाबत  आदेश काढला  आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाची पाऊलं उचलताना दिसत आहे. 

बुधवारी झालेल्या बैठीत  राजेश टोपे यांनी पुढे लॉकडाऊन वाढवणारचं असे संकेत दिले. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे. एकंदर राज्यात वाढणाऱ्या रूग्णांची संख्या आणि मृतांच्या संख्येतही होणारी वाढ पाहाता  लॉकडाउनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती.

15 मेपर्यंत काय सुरू राहणार
- राज्यात सर्व आत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये भाज्यांची दुकानं, किराणा स्टोर, फळ विक्रेते सर्व प्रकारची खाद्य दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

- कृषी क्षेत्राशी निगडीत दुकानं, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकानं त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांची दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

- तर स्थानिर प्रशासनाला संबंधित भागातील परिस्थिती पाहाता निर्णय घेता येणार आहे. 

काय बंद राहणार? 
- राज्यातील सर्व सलून, ब्यूटी पार्लर बंद राहतील.

- शाळा महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, हॉटेल बंद राहतील. 

- धार्मिक स्थळं बंद राहतील. 

- विवाहासाठी 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी

- अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी

- सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील.