महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'

Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 14, 2024, 03:00 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...' title=

Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. 

'महाराष्ट्रात परतणार नाही'

महाराष्ट्रात यावं असं वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले, "आता मी दिल्लीत गेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. माझं क्षेत्रही बदललं आहे. नेतृत्व करण्याची संधी मिळाली तरी इच्छा नाही. महाराष्ट्र सांभाळण्यासाठी अनेकजण सक्षम आहेत असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. 

'पक्षफुटीची सहानुभूती ठाकरे-पवारांना मिळणार नाही'

निवडणुकीतील विजयानंतर लोक अनेक कारणं सांगत असतात. पराभव झाल्यावर सगळे शांत बसतात. कारण पराभव अनाथ असतो आणि विजयाचे अनेक बाप असतात असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर; म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी...

 पक्षफुटीची सहानुभूती ठाकरे-पवारांना मिळणार नाही असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. सहानुभूतीच्या मुद्याबाबत नितीन गडकरी साशंक आहेत. पक्षफुटीची सहानुभूती मिळणं कठीण वाटत आहे असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला परिस्थिती राहणार नाही असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. 

लोकांना राजकीय खिचडी आवडली नसेल तर नाकारावी... राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा अशी रोखठोख भूमिकाही त्यांनी मांडली आहे. आम्ही शेतमालाला योग्य हमीभाव दिला आहे. त्याचा शेतक-यांना नक्कीच फायदा होईल. मात्र सध्याची परिस्थिती पाहता देशातील पीक पद्धत बदलण्याची गरज आहे असं मत नितिन गडकरींनी व्यक्त केलं आहे. 

'मी काही कुशल राजकारणी नाही'

नितीन गडकरी यांना विरोधक तुमच्यावर फारशी टीका करत नाहीत? असं विचारलं असता म्हणाले "मी काही कुशल राजकारणी नाहीये. मी सामान्य व्यक्ती आहे. माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे, दोन रेषा आहेत एक आपली आणि एक दुसऱ्यांची. आपली मोठी करायची आणि दुसऱ्यांची पुसण्याचा प्रय़त्न केला की आपली मोठी होती. पण मी मी पहिले ठरवले आपली रेषा मोठी करायची. आपलं काम करायचं".