मुंबई : आमच्याकडे जनमत नाही, आम्ही विरोधातच बसणार असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. त्यांनी नुकतीच सिल्व्हर ओक येथे जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर झी २४ तासला पटेल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार या भुमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाम असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसची भुमिका सुरुवातीपासून विरोधातच बसण्याची होती मग संजय राऊत यांच्याशी चर्चा करण्याचे चित्र का निर्माण केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वात राष्ट्रवादीची भुमिका या सर्वात संशयाची ठरत आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपालांनी सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले. शिवसेनाशिवाय १०५ आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी १४५ चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळू शकते. दरम्यान 'भाजपानं नकार दिला तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यायला हवं' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता सत्तेचं समीकरण कोणत्या बाजुला वळण घेते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.