महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

Gram Panchayat Election Result: महाराष्ट्रात आज ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. पाहा कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत.

Updated: Sep 19, 2022, 06:53 PM IST
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर title=

Maharashtra Election Result 2022 : महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचंच वर्चस्व दिसत आहे. 495 पैकी 144 ग्रामपंचायती भाजपच्या (BJP) ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे 126, शिंदे गटाला 41, ठाकरे गटाला 37 तर काँग्रेसला 62 जागा मिळाल्या आहेत. इतरांनी 88 जागांवर सरशी घेतली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2022)

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. भाजप आणि शिंदे गटानं 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केलाय. शिंदे गटानं 40 पेक्षा जास्त सरपंचपदं मिळवल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत 125-130 जागा जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. मित्रपक्षांसह 150 जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी हा दावा केलाय.

यवतमाळ ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत-72

शिवसेना (ठाकरे) - 03
भाजप- 20
राष्ट्रवादी- 09
काँग्रेस- 33
मनसे - 1
स्थानिक - 06

नांदेड ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत- 91

शिवसेना - 04
शिंदे गट - 00
भाजप- 16
राष्ट्रवादी- 03
काँग्रेस- 12
स्थानिक आघाडी- 03

सातारा तालुका ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत- 9

शिवसेना - 0
शिंदे गट - 2
भाजप- 2
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस-
इतर -

2 बिनविरोध झालेल्या आहेत 
1 ग्रामपंचायत निवडणूक झालीच नाही

नंदुरबार ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत- १४९

शिवसेना - ००
शिंदे गट - २८
भाजप- ३९
राष्ट्रवादी- ०१
काँग्रेस- ०५
स्थानिक विकास आघाडी - ०३

बुलडाणा ग्रामपंचायत निकाल 

एकूण ग्रामपंचायत 07

भाजप -1
काँग्रेस - 00
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 00
स्थानिक आघाडी -02
परिवर्तन पॅनल - 03

अकोला ग्रामपंचायत निकाल

शिवसेना ( ठाकरे गट ) - 2
अपक्ष - 2
वंचित बहुजन आघाडी - 1
प्रहार प्रणित - 1

दिंडोरी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचे निकाल

एकूण ग्रामपंचायत- 46 (4 बिनविरोध)
शिवसेना - 2
शिंदे गट - 0
भाजप- 0
राष्ट्रवादी- 9
काँग्रेस- 0
माकप- 1
इतर - 3

अकोले तालुका ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत- 45

शिवसेना - 00
शिंदे गट - 00
भाजप- 8
राष्ट्रवादी- 14
काँग्रेस- 00
इतर - 09

जुन्नर ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायत 33

शिवसेना - 2
शिंदे गट - 00
भाजप- 2 
राष्ट्रवादी- 12
स्थानिक आघाडी 10
एक ग्रामपंचायत तिरंगी सत्ता
अपक्ष- 1

धुळे जिल्ह्यातील 33 पैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजपचं एकहाती वर्चस्व 

जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दाखवून दिलंय. केवळ एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता काबीज करता आलीय. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात आमदार अमरीश पटेल यांच्या गटानं एक हाती वर्चस्व गाजवत सत्ता काबीज केली. मोयदा ग्रामपंचायत वगळता उर्वरित 32 ग्रामपंचायतींवर भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे 3 ग्रामपंचायती गेल्या आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींवर विजय झाला आहे. जळगावात चार ग्रामपंचायतींवर अपक्षांची सत्ता आली आहे.