धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर

कोरोनाचा (Coronavirus )  सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे.  

Updated: Apr 20, 2021, 11:47 AM IST
धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाचा (Coronavirus )  सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित हे राज्यात आहेत. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाची  परिस्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीचे नियमही अनेकांकडून पाळले जात असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर दिसून येत आहे. (highest Coronavirus mortality rate in Western Maharashtra)

राज्यात काल 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात काल 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56 टक्के एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची 38,40,000 इतकी संख्याआहे. या पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 10,14,000 असून राज्यात एकूण 27 टक्के रुग्ण आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 16,535 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 60, 473 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोल्हापूरचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे, ही जमेची बाजू आहे. त्यानंतर सातारा, सोलापूर आणि सांगलीचा क्रमांक लागतो. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक 7.3 लाख कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यानंतर सोलापूर 85 हजार, सातारा 81 हजार, सांगली  64 हजार, कोल्हापूर 56 हजार अशी रुग्णसंख्या आहे. तर दुसरीकडे दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील वाढत आहे. पण तुलनेत लसीकरणाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. आता मुंबईत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे.

एकूण कोरोना बाधितांची संख्या

देशात 1.92 कोटी
राज्यात 38.4 लाख
पुणे 7.3 लाख
सोलापूर 85 हजार
सातारा 81 हजार
सांगली  64 हजार
कोल्हापूर 56 हजार

कोरोना बाधितांचा मृत्यूदर

देशात 1.19  टक्के
राज्यात 1.58 टक्के
पुणे 1.21 टक्के
सोलापूर 2.54 टक्के
सातारा 2.57 टक्के 
सांगली  3.13 टक्के
कोल्हापूर 3.15 टक्के