Maharashtra Monsoon Update | पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Updated: Jul 7, 2021, 09:04 PM IST
Maharashtra Monsoon Update | पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी title=

मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीचं संकट ओढावलं. दरम्यान पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. (Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये.