मुंबईसह राज्यात काही भागात वरुणराजाची हजेरी, कोकणाला आज यलो अलर्टचा इशारा

Maharashtra Mansoon Updates: सकाळपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली आहे. तर कोकणात आज यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jul 3, 2023, 06:43 PM IST
मुंबईसह राज्यात काही भागात वरुणराजाची हजेरी, कोकणाला आज यलो अलर्टचा इशारा title=
Maharashtra Monsoon Update today Yellow alert for Konkan mumbaid and Maharashtra Rain Update Today

Maharashtra Weather News: मुंबईसह (Mumbai) राज्यात अनेक भागात पावसानं अखेर हजेरी लावली आहे. आज मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज कोकणाला यलो अलर्ट आणि कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्टचा इशारा (Maharashtra Rain Update Today) दिला आहे. विदर्भातही पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Monsoon Update)

येत्या तीन-चार दिवसात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आजपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील अनेक भागात दिसून येणार आहे.  (Maharashtra Monsoon Update today Yellow alert for Konkan mumbaid and Maharashtra Rain Update Today)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पाणीसाठ्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. गेल्या शनिवारी 6.49 टक्क्यांवर आलेला पाणीसाठा आठच दिवसांत 12.85 टक्क्यांवर पोहोचलाय. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. रोज 100 ते 150 मिमी पावसाची नोंद होत आहे. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. धरणांमध्ये 1 ऑक्टोबरला 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणं शक्य होतं. 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. धरण क्षेत्रातदेखील पावसाची संततधार कायम आहे.गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर वाढल्याने पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे. धरणांचा पाणी पातळीत देखील धीम्या गतीनं वाढ होते आहे.

साताऱ्यातील येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झालाय. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे येवतेश्वर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे त्रंबकेश्वरमध्ये रस्त्यावर पुरसदृश्य परिस्थिती होती.  पावसाने जोर धरल्यामुळे धरणांमध्ये आवक सुरू झाली आहे पर्यटकांनी परिसरात फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केलंय.

नाशिक जिल्ह्यात पावसाच्या आगमनासह आता वर्षासहलीसाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय. पहिल्या विकएंडला शहरी पर्यटकांचा ओढा दऱ्याखोऱ्यांत दिसून आला. पर्तवरांगांमधले धबधबे प्रवाहीत झालेत तसंच नद्याही दुथडी भरून वाहू लागल्यात. त्यामुळे पर्यटकांचा उत्साह आणखी वाढतोय. 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा,मालेगाव,वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी  जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे जिल्ह्यामध्ये पेरणीला गती येणार असून धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोणावळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसाने इथला निसर्ग अक्षरशः नटून गेलाय. सह्याद्रीच्या पर्वत रांगा धुक्यात हरवल्यात. त्यातूनच छोटे छोटे धबधबे वाहू लागलेत. पर्यटकही त्यामुळे विक एंड साजरा करण्यासाठी गर्दी करू लागलेत.