Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी मैदानात पोहोचले आहेत. चाचण्या सुरु झाल्या आहेत पण यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. राज्यभरात थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून याचा पोलीस भरतीवर परिणाम झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे. तसेच पावसामुळे पोलीस भरतीवेळी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
राज्यात सध्या काही जिल्ह्यांत पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असल्याने अशा वातावरणात भरती प्रक्रिया राबवणे योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. दरम्यान फडणवीसांनी यावर भाष्य केले आहे.
पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले.
ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही तिथे चाचण्या होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पोलीस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. राहण्याची जागा नसल्याने ही मुले आपल्याला बस स्टॅण्डवर वैगेरे दिसतयात. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना केल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.यात इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एका प्रकल्पाचं प्रेझेंटेशन करण्यात आलं. ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे. जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे या करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याच सादरीकरण आज झालेलवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
या प्रकल्पामुळे कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून ती शोधून काढू शकतो. पोलिसांना गुन्हा घडल्यानंतर तपासासाठी काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनातही याचा फायदा होईल. ज्या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईलय. सर्वात आधुनिक सायबर केंद्र आपण तयार केले आहेय लवकरच ते कार्यनवित होईल. त्यामुळे सर्वात सशक्त पोलीस दल देशात आपले असेल, असेही ते यावेळी म्हणाले.