भुजबळ वि. कांदे वादाचा भडका, येवला मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाशिकचं जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून कांदे आणि भुजबळ यांच्यातील  विविध कारणांनी संघर्षाची धग कायम आहे. समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा उफाळून आला.  एकमेकांवर होत असलेल्या आरोपांनी सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालय.

राजीव कासले | Updated: Oct 25, 2024, 09:35 PM IST
भुजबळ वि. कांदे वादाचा भडका, येवला मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटला title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक  : नाशिकचं जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून सुहास कांदे (Suhas Kande) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील  विविध कारणांनी संघर्षाची धग कायम आहे. समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघात (Nandgaon Vidhansabha Constituency) अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा उफाळून आला. आता सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून  थेट मंत्री छगन भुजबळ यांच्या समोर शड्डू ठोकलाय. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा कांदे यांनी दिलाय. यावेळी कांदे यांनी छगन भुजबळ कुटुंबीयांवर काही गंभीर आरोप केलेत. 

कांदेंचे भुजबळांवर आरोप
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मॅनेज करत भुजबळ यांनी सुटका करून घेतला. असा आरोप कांदे यांनी केलाय. समीर भुजबळ हे मोठे गुंड आहेत. त्यांना लोकांनीच तडीपार केल्याचा आरोप कांदेंनी केलाय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस प्रकरणी  सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी मला पैशाची ऑफर केली होती असाही दावा कादेंनी केलाय. 

कांदे यांच्या आरोपांना उत्तर देताना छगन भुजबळ यांनी आम्ही कायदेशीर लढाई कायद्याने लढू असं स्पष्ट केलंय. भुजबळांचे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारे कांदे आता भुजबळ कुटुंबीयांना डोईजड झालेत. 

2009 पूर्वी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदगाव मतदारसंघाची जबाबदारी छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांना दिली होती. त्यावेळी पंकज भुजबळ यांना आमदार करण्यामध्ये कांदे यांचा मोठा वाटा होता. मात्र, कांदे यांनी 2014 मध्ये पंकज भुजबळ यांनाच आव्हान दिलं. मात्र त्यावेळी कांदे यांचा पराभव झाला होता. मात्र 2019 मध्ये सुहास कांदे यांनी पराभवाची परतफेड करत पंकज भुजबळ यांना धूळ चारली. तेंव्हापासूनच भुजबळ-कांदे यांच्यात राजकीय वैमनस्याला सुरुवात झाली