मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का आहे. कोर्टाकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने आता सुनावणी लांबणीवर जात आहे. 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती. ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे.
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना पक्षावर दोन्ही गट दावा करत आहेत. आता यात नेमका दावा कोणाचा योग्य हे ठरवण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावली होती.
या नोटीसनंतर शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिवसेनेतील अंतर्गत वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून शिंदे गटातील आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. एवढ नाही तर सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात मात्र तारीख पे तारीख अशी अवस्था आता.
सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल येणार की पुन्हा सुनावणी पुढे जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.