Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप

Latest Political Update: संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Updated: Feb 19, 2023, 10:21 PM IST
 Maharashtra Politics:  ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे:  (Latest Political Update) गेल्या दोन दिवसांपासून आता या सत्तासंघर्षाला नवी कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच शिंदे गट विरूद्ध ठाकरे गटात एक वेगळीच रणधुमाळी पाहायला मिळते आहे. संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कसबा विधानसभा मतदार संघातील गुजराती हायस्कूल येथे व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Shinde Gat) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra Politics shinde group spokesperson naresh mhaske slams sanjay raut)

 

यावेळी शहर प्रमुख नाना भानगिरे (Maharashtra Politics) हे देखील उपस्थित होते. यावेळी नरेश म्हस्के म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्रित राज्य सरकार असून राज्यभरात चांगल काम सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या भागात जात आहेत. त्या ठिकाणी नागरिक जोरदार स्वागत करीत असून आता आम्हाला शिवसेना चिन्ह मिळाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 

तसेच आता पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आहे. ते प्रचंड मतांनी विजयी होणार असून त्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसबा मतदार संघातील फडके हौद येथील गुजराती हायस्कूल येथे 4 वाजता व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहे तसेच 24 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

कसबा पोटनिवडणुकीनंतर पुणे शिवसेना भवन कार्यालयाचे उदघाटन होणार : शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां साठी सारसबाग परिसरात भव्य अस शिवसेना भवन उभारण्यात आले आहे.या शिवसेना भवनचे उदघाटन कसबा विधानसभा पोटनिवडणुकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.