एसटी कर्मचारी संपावर ठाम

एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळं आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमूदत संपावर जाणार हे निश्चित आहे.

Updated: Oct 16, 2017, 10:33 PM IST
एसटी कर्मचारी संपावर ठाम title=

मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळं आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमूदत संपावर जाणार हे निश्चित आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पूकारलेल्या या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा यासाठी दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं.

मात्र, परिवहन मंत्री तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळं संप अटळ आहे.

दुपारी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा झाली. पण, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

यामुळे एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनांचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.