महाराष्ट्र विधान परिषदेकडून उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार जाहीर

Maharashtra Vidhan Parishad Awards:  विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Sep 3, 2024, 03:11 PM IST
महाराष्ट्र विधान परिषदेकडून उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार जाहीर title=
महाराष्ट्र विधान परिषदेकडून उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार जाहीर

Maharashtra Vidhan Parishad Awards: महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी सोहळा विधान भवनात पार पडत आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत.एकूण 53 आजी माजी सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला दोन्ही सभागृहातील आजी - माजी सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहेत. त्या सर्व विधिमंडळातील आजी आणि माजी सदस्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते विधान आज भवन येथे दिले जाणार आहेत, कोणाला मिळाले पुरस्कार? जाणून घेऊया. 

2018 - 19 सालाचे पुरस्कारथी, संसदपटू

1 - बाळासाहेब थोरात , काँग्रेस 

2 - संजय कुटे, भाजप 

3 - नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी विधानसभा उपाध्यक्ष. 

4 - पराग आळवणी ,भाजप 

6 - नीलम गोऱ्हे, शिवसेना 
विधान परिषद उपसभापती .

7- निरंजन डावखरे, भाजप 

8 - सुजितसिंह ठाकुर, भाजप 

2019 - 20 या वर्षातील पुरस्कार पुरस्कारथी सदस्य

1 प्रकाश आबिटकर,शिवसेना 

2 आशिष शेलार,भाजप

3  सुनील प्रभू शिवसेना UTB 

4 दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी 

5 सतीश चव्हाण,राष्ट्रवादी 

6 अनंत गाडगीळ, काँग्रेस 

7 रामहरी रुपनवार, काँग्रेस 

8 श्रीकांत देशपांडे, अपक्ष. 

2020 - 21 सालाचे पुरस्कारथी सदस्य  

1 अमित साटम, भाजप 

2 आशिष जयस्वाल, अपक्ष 

3 प्रताप सरनाईक, शिवसेना 

4 प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी 

5 प्रवीण दरेकर, भाजप 

6 दिवंगत, विनायक मेटे, शिवसंग्राम 

7 मनीषा कायंदे,शिवसेना 

8 बाळाराम पाटील, शेकाप 

2021 - 22 सालचे पुरस्कारथी सदस्य 

1 संजय शिरसाट शिवसेना 

2 प्रशांत बंब, भाजप .

3 सरोज आहिरे, राष्ट्रवादी 

4 सिद्धार्थ शिरोळे, भाजप 

5 अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी 

6 सदाभाऊ खोत, भाजप 

7 गोपीकिशन बाजोरिया शिवसेना. 

8 विक्रम काळे, राष्ट्रवादी .

2022 -23 सालचे पुरस्कारथी सदस्य 

1 भरत गोगावले,  शिवसेना 

2 चेतन तुपे, राष्ट्रवादी 

3 समीर कुणावर, भाजप 

4 यामिनी जाधव, शिवसेना 

5 अभिमन्यू पवार, भाजप 

6 प्रसाद लाड, भाजप 

7 महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष 

8 बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादी 

9 प्रज्ञा सातव, काँग्रेस 

2023-24 या वर्षाचे पुरस्कार्थी सदस्य 

1 रमेश बोरणारे, शिवसेना 

2 अमीन पटेल, काँग्रेस 

3 राम सातपुते भाजप 

4 कुणाल पाटील, काँग्रेस 

5 श्वेता महाले, भाजप .

6 प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी 

7 अमोल मिटकरी, राष्ट्रवादी 

8 गोपीचंद पडळकर भाजप 

9 रमेश पाटील भाजप 

10 हामशा पाडवी, शिवसेना 

11 श्रीकांत भारतीय, भाजप 

12 सुनील शिंदे, शिवसेना