Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...

Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात. 

नेहा चौधरी | Updated: Apr 13, 2024, 08:28 AM IST
Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर... title=
maharashtra weather news rain hailstorm prediction vidarbh marathwada madhya maharashtra mumbai weather update

Maharashtra Weather News : राज्यातील लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापत असताना काही भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. देशातील काही भागांमध्ये सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असली तरी काही भागांमध्ये अवकाळी संकट कोसळलंय. हवामान विभागानुसार देशासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीकेंडलाही पावसाची हजेरी असणार आहे. (maharashtra weather news rain hailstorm prediction vidarbh marathwada madhya maharashtra mumbai weather update)

'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा 

हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानुसार दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित केलाय. सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 

मुंबईत असेल वातावरण 

हवामान विभागाने अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि दुपार/संध्याकाळपर्यंत अशंतः ढगाळ होईल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २५°C च्या आसपास असेल. 

देशातील 'या' भागांमध्ये वातावरणात गडबड

गेल्या 24 तासांत, राजस्थान, मध्य प्रदेश काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, तेलंगणा, केरळ, दक्षिण तामिळनाडू, ईशान्य बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहिला मिळाला. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टी झाली. 

उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस झाला. मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याचा पाहिला मिळालं.