बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारीशक्तीचं रौद्ररूप, पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं... Video Viral

ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने चांगलाच चोप दिल्याची घटना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घडली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:ला आरटीआय कार्यक्रता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. 

मयुर निकम | Updated: Oct 4, 2023, 09:18 PM IST
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारीशक्तीचं रौद्ररूप,  पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं... Video Viral title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा :  तक्रार मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणआऱ्या एका व्यक्तीला दोन महिलांनी चपलेने धुतलं. हा व्यक्ती स्वत:ला आरटीआय कार्यकर्ता (RTI Workers) म्हणवत होता. बुलडाणा जिल्हाघिकारी कार्यालयत (Buldhana Collector Office) ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  संतोष चांदमे असं या व्यक्तीचं नाव असून हा व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. ज्या कायद्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. त्याचा वापर हा पैसे उकळण्यासाठी करत होता. अनेक ग्रामपंचायतींवर आरटीआय टाकत पैसे उकळण्याचं काम हा व्यक्ती करत होता. अशी अनेक प्रकरणं समोर आली होती. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर (Mehkar) तालुक्यातील भालेगाव इथल्या महिला उपसरपंच आणि महिला सदस्य यांनाही खोटी तक्रार दाखल करत या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत खंडणी मागितली. 

महिलांचं रौद्ररुप
या घटनांना जरब बसावा यासाठी महिला उपसरपंच मंगला निकम आणि महिला सदस्य अनिता काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालया धडक देत या व्यक्तीला तिथे गाठलं आणि जाब विचारला. सुरुवातीला त्याने उडवाउडवी करत या महिलांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पण या महिलांनी रौद्ररुप धारण केलं.  अश्लील शिवीगाळ आणि एक लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणेला त्यांनी चपलेने चांगलेच धुतलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. संतोष चांदणे याने भालेगाव सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरणं आपापसात मिटवण्यासठी तो पैसे उकळतो.

असाच प्रकार भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबात ही घडला. संतोष चांदणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याने एक लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे मंगला निकम आणि अनिता काळे यांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलेच धुतलं. अचानक घडलेल्या या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.