मुंबई : राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का बसला आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का बसला आहे. तर नागपुरात महाविकासआघाडीने बाजी मारत जोरदार मुसंडी मारली आहे. तर नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपची घोडदौड सुरु आहे.
BREAKING NEWS :
नागपूर जिल्हा परिषद निकाल : फडणवीस आणि गडकरींना मोठा धक्का... महाविकास आघाडीची मुसंडी #Nagpur #Maharashtra
https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/O5ErTMCCOc— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 8, 2020
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. या ठिकाणी मंत्री गडकरी आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस, माजी मंत्री बावनकुळे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. येथे काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेस हद्दपार होण्याऐवजी भाजपच या दिग्गजांच्या ठिकाणी झाले आहे.
दरम्यान, धुळ्यात भाजपनं मुसंडी मारलीय. जिल्हा परिषद निकालांमध्ये धुळ्यात काय होणार याची सर्वांनाच उत्सुक्ता होती. कारण सर्वच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी धुळ्यात तळ ठोकला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणविसांनी धुळ्यातल्या प्रचारात विशेष लक्ष घातलं होतं. त्याचाच परिणाम म्हणजे धुळ्यात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. आमदार जयकुमार रावल यांच्या मतदार संघात १० पैकी ८ ठिकाणी भाजपनं विजयी आघाडी घेतली आहे.