महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा

बुलढाणा येथील अक्षय गवते वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी शहीद झाला आहे. अक्षय हा महाराष्ट्रातील पहिला अग्नीवीर आहे. 

Updated: Oct 22, 2023, 11:06 PM IST
महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे.  बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील अक्षय वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी शहीद झाला आहे. अक्षयच्या दु:खद निधनामुळे  पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात तहृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच अक्षय यांचा मृत्यू झाला. अक्षय याच्यावर सोमवारी 23 ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या  जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय "अग्निवीर"म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये ते कर्तव्यावर होते जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अवस्थामुळेच त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री त्यांचा हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला आज सायंकाळी इंडिको विमानाने अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात येईल सोमवारी सकाळी पार्थिव छत्रपती संभाजीनगर वरून पिंपळगाव सराई येथे आणण्यात येईल तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा 

गेल्या वर्षी त्यांची अग्निवीर मध्ये भरती झाली अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अक्षय यांना एक लहान बहिण अक्षय यांचे आई वडील शेती करतात अक्षय यांची मृत्यूची वार्ता  कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे...

मूळ गावी होणार अंत्य संस्कार 

दिवंगत अक्षय गवते यांचे पार्थिव विमानाने चंदीगड, दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे. उद्या २३ ऑक्टोबरला सकाळ पर्यंत पार्थिव गावी आणले जाण्याची शक्यता असल्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक विष्णू उबरहंडे यांनी सांगितले.. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, निवासी उपजिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार तसेच पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे उबरहंडे यांनी माहिती दिली.