पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कांचन हॉटेलला भीषण आग

पुणे-सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावरील दौंड तालुक्यामधील यवत येथील प्रसिद्ध कांचन हॉटेलला भीषण आग लागली आहे.

Updated: Jun 1, 2021, 06:48 PM IST
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कांचन हॉटेलला भीषण आग title=

दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावरील दौंड तालुक्यामधील यवत येथील प्रसिद्ध कांचन हॉटेलला भीषण आग लागली आहे. या हॉटेलमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे या हॉटेलची संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात आली आहे. सध्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

कांचन हॉटेल हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावर मुख्या ठिकाणी असल्याने अनेक नामांकित लोकं पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अनेक नामांकित मंडळी या ठिकाणी थांबत असतात. अचानक लागलेल्या या आगीचे कारण अध्याप समजू शकले नाही. अग्निशामकदलाला बोलवण्यात आलेले आहे. परंतु ते अद्याप घटनास्थळी पोहचलेले नाही.

अगदी काही क्षणातच ही आग संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली या हॉटेल मध्ये लाकडी आणि गवताळ तसेच ज्वलनशील साहित्य आणि वस्तू असल्याने आगीने पेट घेतला होता. अर्धा ते पाऊण तास या आगीचे आणि धुराचे लोट हवेत उंच जात होते.

या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामकदलाला  बोलाविण्यात आले होते, मात्र अर्धा तास उलटून ही याठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले नाही, आता या आगीने रौद्र रुप घेतले असल्याने या आगीचे लोट लांबुनही दिसत आहेत.