सरकार गडगडणार... नारायण राणेंकडून पुन्हा तारीख पे तारीख

आमच्याकडे वादळ येतं, वादळ आलं की झाडं उन्मळून पडतात... तसं आघाडी सरकार...  

Updated: Apr 19, 2022, 05:14 PM IST
सरकार गडगडणार...  नारायण राणेंकडून पुन्हा तारीख पे तारीख title=

वाशिम : मी महसूलमंत्री होतो तेव्हा 82 एकरचा सरकारी भूखंड फक्त 12 कोटी रुपयांमध्ये विकला असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण, माझं सरकारला आव्हान आहे की फक्त आरोप करू नका, कोणतीही चौकशी लावा, असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारला दिलंय.

मी कोणतीही चूक केली नाहीय. त्यामुळे माझ्यावर Acb ची चौकशी लावा नाही तर अन्य कोणतीही चौकशी लावा. त्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं ते म्हणालेत.

महाविकास आघाडी हे एक फांद्यांचं झाड आहे. आमच्याकडे कोकणात जूनमध्ये वादळ येतं. वादळ आलं की झाडं उन्मळून पडतात. झाडाच्या एका फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते मुख्य खोड नाहीत. त्यामुळं हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच कोसळणार असं भाकीत नारायण राणे यांनी वर्तवलं.