धक्कादायक! काँग्रेस नेत्यानं बुडवले 12 कोटी

 वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी GSTचे 12 कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. 

Updated: Mar 10, 2021, 09:09 AM IST
धक्कादायक! काँग्रेस नेत्यानं बुडवले 12 कोटी title=

सांगली: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना आता मोठा घोळ समोर आला आहे. काँग्रेस नेत्यासह काही बड्या लोकांनी 12 कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजयनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी GSTचे 12 कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. 

याप्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कील यांनी फिर्याद दिली आहे. 2020-21 या वर्षात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या वस्तू व्यापाऱ्यांना विकल्या आहेत. त्या व्यापाऱ्यांकडून जीएसटीची रक्कमही कारखान्याने घेतली आहे. ती रक्कम 12 कोटी 44 लाख रुपये आहे. व्यापाऱ्यांकडून ती रक्कम घेऊनही राज्य जीएसटीच्या कार्यालयात ती रक्कम न भरल्याने  कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसवर यामुळे टीका होत आहे. तर काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेते आणि पोलीस काय करवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.