Rohit Patil | आर आर पाटलांचा मुलगा रोहित म्हणतोय, तुम्हाला निकालानंतर माझ्या बाबांची आठवण येईल

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचारसभेची सांगता ही राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या भाषणाने झाली.

Updated: Dec 20, 2021, 05:32 PM IST
Rohit Patil | आर आर पाटलांचा मुलगा रोहित म्हणतोय, तुम्हाला निकालानंतर माझ्या बाबांची आठवण येईल  title=

सांगली : जिल्ह्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीची (Sangli Nagarpacnhyat Election ) लगबग सुरु आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचारसभेची सांगता ही राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या भाषणाने झाली. रोहितने या प्रचारसभेत केलेलं वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. (Mahrashtra Former Home Minister late R R Patil Son Rohit Patil Emotional speech sangli Nagrapanchyat election Kavathe Mahankal during Campaign meeting)

"या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला जाहीर होईल. त्यावेळेस माझ्या बापाची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही", अशी भावनिक साद रोहित यांनी मतदारांना घातली.

रोहित पाटील काय म्हणाले?

'आमच्या मनातील पॅनेल निवडलंय', असं  मी निवडलेल्या पॅनलबाबत सर्वसामन्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसाने राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. सर्वसामान्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीय. या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला लागणार आहे. निकाल लागल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही", असं म्हणत रोहित यांनी मतदारांच्या मनात हात घालण्याचा प्रयत्न केला.