मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक आणि गडकिल्यांसदर्भातील शासनाची भूमिका या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेतली. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचा निवडणुकीसाठी कोणाला ही पाठींबा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आबासाहेब पाटील आणि विनायक मेटे यांनी आपली राजकीय पोळी भाजू नये असेही यावेळी सांगण्यात आले. आगामी निवडणुकीवर मराठा क्रांती मोर्चाने आपली भुमिका स्पष्ट केली.
राजकीय जर भूमिका घ्यायची असेल तर मराठा समाज राज्यव्यापी बैठक घेऊन आपली भूमिका ठरवेल असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सध्या गाजणाऱ्या गडकिल्ल्यांसदर्भातील प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. गड किल्ले भाडे तत्वावर देण्यास आमचा विरोध राहील या भुमिकेवर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे. जर कोणी भाडे तत्वावर किल्ला घेतला तर त्याला गडावरून खाली फेकणार असा टोलाही यावेळी लगावण्यात आला. गडांना हात लावणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले त्यांनी ते लेखी द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांना करण्यात आले.