मी दिलेल्या उमेदवाराला समाजाने मतदान करा, दगड असेल तरी निवडून द्या- जरांगे

Maratha Candidate in Vidhansabha Election: मी उमेदवार देईल त्याला फक्त समाजाने मतदान करावे. दगड असेल तरी निवडून द्या. त्याच्याकडून काम मी करून घेईल, असे आवाहन जरांगेंनी समाजाला केले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 25, 2024, 01:11 PM IST
मी दिलेल्या उमेदवाराला समाजाने मतदान करा, दगड असेल तरी निवडून द्या- जरांगे  title=
मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका (फोटो सौजन्य-पीटीआय)

Maratha Candidate in Vidhansabha Election: मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टिका केलीय. तसेच विधानसभा निवडणुकीत मी दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन समाजाला दिलंय. गेली 13 , 14 वर्ष काही झाले नाही मग माझ्यावरच आता कारवाई का? मी गोर गरिबांसाठी लढतोय म्हणून?  पुण्यात जाऊन मी जमीन घेऊन आलो, आता नोटीस नाही, डायरेक्ट वॉरंट, का घडवून आणतात हे?  असे प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारले. मला बदनाम करण्यासाठी हे चाललंय. मला आधीही कुठलीही नोटीस आली नाही.  हे फडणवीस साहेबांना शोभत नाही. आमचे अभियान बदनाम करू नका. तुम्ही गोडी गुलाबीने हाताळले तर तुमच्या अंगलट येणार नाही, असे ते म्हणाले. उपोषण सुरू असताना तिथं बसून काम होत नव्हतं आता इथं बसून काम होईल, मी कामाला लागलोय.. सरकार ऐकायला तयार नाही, लोक ऐकत नाही, मी या आधीही सलाइन काढून टाकले  पण वेळ जातो आणि काम करायचं होतं. सरकारवर विश्वास नाही असा शब्द मी वापरणार नाही आणि नवी डेडलाईन त्यांनी मागितली होती म्हणून 13 ऑगस्ट पर्यंत वेळ दिल्याचे जरांगे म्हणाले. मी रात्री बरेच उमेदवार निवडले निवडणुकीचा काम सुरू केल्याचे जरांगेंनी सांगितले. 

पवारांनी थेट बोलावे

पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जरांगेंनी भाष्य केले. शरद पवार आमच्या बाजूने काही बोलले असतील हे वाटत नाही आणि बोलले असतील तर थेट बोलावे ना , काय लपवायच? असा प्रश्न त्यांनी विचारला. 19 ऑगस्टला मराठा समाजाचे बैठक बोलावून सगळं जाहीर करणार आहे.   आमची बाजू मांडणारा जो कुणी असेल त्यांना निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले. 

'मला ट्रॅप केले जातंय'

येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाहीय.प्रसाद लाड बोलतायत पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. हे मागच्या दारावरील आमदार आहेत.दरेकरांच्या चकाट्या ऐकायला वेळ नाही.आपले गोरगरीब फडणवीस साहेबांच्या टेबलाजवळ बसवायचे. पण ते उत्तर देत नाहीत. माझ्यावर टीका हा त्यांच्या अभियानाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी उत्तर दिलं नाही. त्यांनी अंगावर घेऊ नये ही विनंती आहे.माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, निलेश, नितेश यांनी समजून सांगावे. बाकीच्यांना फडणवीस साहेबानी अभियान राबवायला सांगितलं आहे ते राबवताय. आम्ही विश्वास टाकलाय ठरलेलं द्या, पण हे बिलिंदर लोकमध्ये टाकतायत. मला ट्रॅप केले जातंय, सत्ता फडणवीस साहेब चालवतायत. यामुळे भाजप वाटोळं होतंय, फडणवीस रोषाचे धनी होतायत, अशी टिका त्यांनी केली.

दगड असेल तरी निवडून द्या

फडणवीस साहेब आमच्या आई बहिणीला बोलले, आम्ही सहन करायचं का?सरकार सोबत आता शून्य संपर्क आहे. जोवर सहन होतंय तोपर्यंत करू आणि नंतर सगळं बाहेर काढू, असे ते म्हणाले. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पाऊस असू द्या, पूर असू द्या माता माऊली रस्त्यावर दिसेल, असे जरांगे म्हणाले. सगळ्या धर्माचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सगळे आपले उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला फक्त समाजाने मतदान करावे. दगड असेल तरी निवडून द्या. त्याच्याकडून काम मी करून घेईल, असे आवाहन जरांगेंनी समाजाला केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मला बोलावले नाही. भुजबळांना बोलावले. हा ज्याचा त्याचा प्रश्न आम्ही आमचे काम करत जाणार, असे जरांगेंनी सांगितले.