Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ठरणारा कुणबी अहवाल पूर्ण झाला आहे. शिंदे समिती या अहवालावर काम करत होती. शिंदे समितीकडून कुणबी अहवालाचे काम पूर्ण झाले असून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत. यामध्ये आतापर्यंत किती कुणबी नोंदी मिळाल्या आहेत? तसेच मराठा आरक्षणासाठी कोणते पुरावे आहेत? ही सर्व महिती दिली जाणार आहे.
न्यायमूर्ती शिंदे यांनी समिती स्थापन करण्यात आली. पहिला अहवाल 30 ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर आज दुसरा अहवाल देण्यात आला आहे. अहवाल सादर झाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.