खासदार डॉ.हिना गावीत हल्ला प्रकरणी जामीन अर्जावर आज सुनावनी

आज सकाळी अकरा वाजेपर्यंत संशयीतांच्या सुनावणीची शक्यता आहे.

Updated: Aug 14, 2018, 09:02 AM IST
खासदार डॉ.हिना गावीत हल्ला प्रकरणी जामीन अर्जावर आज सुनावनी

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान खासदार डॉ.हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्या २२ संशयीतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. खासदार डॉ. हिना गावीता यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ न्यायालयाने वाढवून दिला. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत संशयीतांच्या सुनावणीची शक्यता आहे.

धुळ्यात  हल्ला

धुळ्यात खासदार हीना गावित यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला. खासदार हिना गावित नियोजन मंडळाची बैठक संपवून नंदुरबारकडे रवाना होत असातंना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनादरम्यान हा हल्ला झाला होता.

आरोपींना अटक

खासदार हिना गावित वाहनात बसलेल्या असातांना गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी हीना गावित यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. गेटमधून काही मराठा आंदोलक मध्ये आले आणि त्यांच्या वाहनावर हल्ला केला. हीना गावित यांना सुरक्षितपणे वाहनातून बाहेर काढण्यात आलं. मात्र, या प्रकारात हिना गावीत यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.