जावेद मुलानी, झी मीडिया, जेजूरी: पाच वर्षांपुर्वी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्यरक्षक संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली होती. तिनं या भुमिकेतून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई (Yesubai) यांची भुमिका केली होती. ही भुमिका तेव्हा प्रचंड गाजली होती त्यामुळे प्राजक्ता गायकवाड हे नावं येसुबाई यांच्या पात्राशी जोडलं गेलं होतं. सगळे तिचे चाहते तिला येसुबाईच्याच भुमिकेत पाहू लागले होते. प्राजक्ता गायकवाडपेक्षा तिला सगळे तिचे चाहते येसूबाई म्हणूनच हाक मारत होते. प्राजक्ता आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर (instagram account) कायमच एक्टिव असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या प्रेक्षकांशी कनेक्टेड असते. सध्या तिनं असाच एक फोटो तिच्या स्टोरीवर (instagram story) शेअर केला आहे. सध्या तिनं असाच एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले आणि भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी तिने येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली आहे. (marathi actress prajakta gaikwad shares a new photo on instagram after taking darshan of khandoba jejuri)
काही दिवसांपुर्वी प्राजक्तानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटर एक पोस्ट शेअर केली होती जी सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती. येसूबाईंच्या भुमिकेच्या प्रचंड यशानंतर पुन्हा एकदा प्राजक्ताच्या चाहत्यांना तिला येसूबाईच्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत 'पुन्हा एकदा.. तोच इतिहास.. तीच भूमिका' असं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. यावेळी तिने डबिंग (dubbing video prajakta gaikwad) करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती डायलॉग डबिंग करताना दिसत आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्राजक्ता गायकवाडनं मराठी टेलिव्हिजनवर (marathi television) स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचा फॅन फोलोईंग जगात प्रचंड आहे. त्यामुळे अनेक तरूण तसेच महिलावर्ग तिचा चाहता आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून प्राजक्ताने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील स्वराज्यरक्षकसंभाजी या मालिकेतून. या मालिकेपासून तिला तिची एक स्वतंत्र ओळख मिळाली आणि तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईची भूमिका प्राजक्ताने साकारली होती. येसूबाई प्रेक्षकांना खूप आवडली होती. प्राजक्ताच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरला. मालिका संपली तरी प्राजक्ताने साकारलेली येसूबाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. मध्यंतरी प्राजक्ता पुन्हा एकदा येसूबाईच्या भुमिकेत चमकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.