VIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा

 वाघिणीची पिलांसह 'माया' मस्ती.

Updated: Oct 26, 2018, 09:17 PM IST
VIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा title=

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मायाळू वाघीण माया म्हणजे ताडोबाचा आकर्षण बिंदू. या वाघिणीची आपल्या पिलांसह होणारी मस्ती सध्या व्हायरल झालीय. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या उत्तम पावसामुळे यंदा थंडीची चाहूल लागली आहे. अशाच एका धुक्याच्या सकाळी आपल्या पिलांसह माया मस्ती करत असलेली आपल्याला या व्हिडिओत बघायला मिळते.

केवळ काही सेकंदांचा हा व्हिडिओ अवर्णनीय आनंद देऊन जातो. कोवळे न, सकाळची थंडी आणि मस्ती टाईम यामुळे वाघोबाच्या या कुटुंबाची सकाळ आनंददायी झाली आहे.