म्हाडाचे घर कोणाला लागणार, पुण्यात आज ऑनलाईन सोडत

 MHADA lottery 2022 : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.  एकूण 4 हजार 222नवीन सदनिकांसाठी आज सोडत जाहीर होणार आहे.  

Updated: Jan 7, 2022, 08:11 AM IST
म्हाडाचे घर कोणाला लागणार, पुण्यात आज ऑनलाईन सोडत title=
संग्रहित छाया

पुणे : MHADA lottery : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)   (Pune MHADA lottery)अंतर्गत 2 हजार 823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार 399 सदनिका अशा एकूण 4 हजार 222नवीन सदनिकांसाठी आज सोडत जाहीर होणार आहे. सकाळी ही सोडत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे घर (MHADA House) घेणाऱ्यांना मोठी उत्सुकता आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत  काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या चार हजार 222 सदनिकांसाठी 80 हजार 848 अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी 65 हजार 180 अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन सोडतीमध्ये सहभाग नोंदविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरसद्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. 

मोठ्या शहरात घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाकबाहेर होत चालले आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी होत असते. अनेकजण म्हाडाच्या सोडतची वाट पाहत असतात. आज पुण्यात म्हाडा घरांची ही सोडत होत आहे. कोरोना काळात मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका हा गृहनिर्माण क्षेत्राला बसला आहे. मात्र अशाही परिस्थितीत पुण्यात म्हाडाने जवळपास दीड वर्षात हजारो घरांची सोडत काढली आहे. म्हाडाने तीनवेळा पुण्यात ही सोडत काढली आहे.