मिलिंद एकबोटे 'हॅबिच्युअल' गुन्हेगार, अटक कधी?

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी आरोपी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. ते 'हॅबिच्युअल' गुन्हेगार अर्थात 'सराईत' गुन्हेगार असल्याचा दावा वकिलांनी कोर्टात केलाय. 

Updated: Jan 23, 2018, 09:32 AM IST
मिलिंद एकबोटे 'हॅबिच्युअल' गुन्हेगार, अटक कधी? title=

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी आरोपी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. ते 'हॅबिच्युअल' गुन्हेगार अर्थात 'सराईत' गुन्हेगार असल्याचा दावा वकिलांनी कोर्टात केलाय. 

एकबोटे यांच्यावर आधीच बारा गुन्हे दाखल आहेत. ते 'हॅबिच्युअल' गुन्हेगार आहेत असा युक्तीवाद करत व्हॉट्स अॅपवरील काही मेसेज आणि इमेजेस कोर्टासमोर फिर्यादींच्या वकीलांनी सादर केल्या.

दोन्हीही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. एफआयआरमध्ये भिडे गुरुजी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. 

कोरेगाव - भिमा येथे एक जानेवारीला दंगल झाली होती. त्यानंतर या दंगलीसाठी एकबोटे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल होता.

पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टानं मिलिंद एकबोटे यांचा जामीनअर्ज फेटाळलाय. त्यामुळं मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.