पुणे : समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सासवड इथे मारहाण झाली आहे. सासवड येथे मंगळवारी सीताराम बाबा पुण्यतिथी कार्यक्रम होता. त्यानिमित्तानं एकबोटे मारूती मंदिरात आले होते. त्याठिकाणी पंडित मोडक यांनी एकबोटे यांना मारहाण केली. पंडित मोडक हे झेंडेवाडी इथे गोशाळा चालवतात. गोशाळा चालवण्याची त्यांची पद्धत चुकीची असल्याचा एकबोटे यांचा दावा आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मतभेद आहेत.
सासडवडमध्ये हा वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही गटात वादावादी झाली. एकबोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद एकबोटे यांना सासवड येथे मारहाण