बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला दिलीप कांबळेंचा विरोध

पुणे शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात येणार आहे. मात्र, आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याला विरोध केला आहे. 

Updated: Mar 12, 2018, 09:40 AM IST
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला दिलीप कांबळेंचा विरोध title=

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात येणार आहे. मात्र, आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याला विरोध केला आहे. 

‘ती जागा मातंग समाजाची’

बालगंधर्व रंगमंदिर ज्या ठिकाणी आहे ती जागा ही मातंग समाजाची आहे. अशा जागेवरील हे रंगमंदिर पाडण्यास माझा विरोध राहील. अस परखड मत राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिका-यांना हा घरचा आहेर दिलाय. पुण्यात त्यांनी यावर्षीच्या बजेटमध्ये सामाजिक न्याय विभागासाठी विविध योजनांसाठी जी तरतुद करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

लहुजी वस्ताद साळवी यांच्या स्मारकासाठी जागा

संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवी यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याकरीता पाच एकर जागा मिळाली असून लवकर त्याचा प्राथमिक आराखडा सादर केला जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यातील ग्रामीण भागात ज्या मातंग समाजाच्या वस्त्या आहेत. त्यांना नव्याने घरे बांधून देण्याकरता निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं काबंळे यांनी यावेळी सांगितले.