मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

Updated: Aug 21, 2017, 06:22 PM IST
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ title=

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

राष्ट्रवादी काँग्रेसने मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भोपळाही फोडलेला नाहीये. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी धक्का देणारीच ठरलीये.

या निवडणुकीत भाजपने ९५पैकी ६१ जागा जिंकताना एकहाती सत्ता काबीज केलीये. तर शिवसेनेला २२ जागा मिळाल्यात. काँग्रेसने १० जागांवर यश मिळवलेय. तर अपक्षांना २ जागा मिळाल्यात.