आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुलत भाऊ राष्ट्रवादीत

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने शहरात आले. 

Updated: Jul 8, 2017, 12:18 AM IST
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुलत भाऊ राष्ट्रवादीत title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने शहरात आले. 

या मेळाव्यातच पिंपरी चिंचवड पालिकेत भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुलत बंधूंनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

सत्तेतून बाहेर पडलो तरी हार मानणार नाही, असा संदेश या मेळाव्यातून अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दिला.  

तसंच पराभवाने खचून जाऊ नका काम करत रहा, असा सल्ला द्यायलाही अजित पवार यावेळी विसरले नाहीत. पक्षातील नेत्यांना सल्ला देत असतानाच भाजपला ही त्यांनी धारेवर धरलं.

भाजपचे मुखपत्र असलेल्या वेबसाईट वर मेळाव्याचा फज्जा झाल्याची बातमी आली तिचा दाखल देत त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला.