ठाणे : राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेऊन फेरीवाले तसंच अनेक प्रश्नांना हात घातला. मग बँकेत मराठी व्यवहार असो अथवा पुन्हा मराठी पाट्या असो... याचा परिणाम ही लगेच दिसला.
सभा संपताच मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील काही दुकानात जाऊन, तुम्ही तुमच्या इंग्रजीत लिहिलेल्या पाट्या त्वरित बदला, असा दमच या दुकानदारांना दिला.
मराठी पाटी आंदोलंन हे ठाण्यातूनच सुरु झाले होतं. शनिवारी राज ठाकरेंनी पुन्हा आपल्या भाषणातून असं आंदोलनं पुन्हा सुरु केलं पाहिजे असा इशाराच दिला.