मनसेच्या 'चले जाओ' बॅनर्सचा नेमका अर्थ काय?

मुंबईत मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेशन आज पार पडत असताना, पुण्यात मनसेने इशारा देणार बॅनर्स झळकवले आहेत. 

Updated: Jan 23, 2020, 05:54 PM IST
मनसेच्या 'चले जाओ' बॅनर्सचा नेमका अर्थ काय?

पुणे : मुंबईत मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेशन आज पार पडत असताना, पुण्यात मनसेने इशारा देणार बॅनर्स झळकवले आहेत. या बॅनर्सवर 'चले जाओ...हा हिंदुस्थान आहे. बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही', असा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा नेमका कुणाला देण्यात आला आहे, हे राज ठाकरे यांचं आज सायंकाळच्या भाषणात स्पष्ट होणार आहे. 

बॅनर्सचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोवर हा इशारा पुण्यातील मनसेचे नेते अजय शिंदे, सुधीर धावडे आणि राम बोरकर यांनी बॅनरद्वारे दिल्याचं दिसून येत आहे.

एनआरसी कायद्याला राज ठाकरे यांच्याकडून समर्थन मिळण्याची शक्यताही यावरून स्पष्ट होत आहे. कारण मनसेच्या झेंड्याचा बदललेला रंग आणि पुण्यातील मनसेच्या बॅनरवरचा इशारा, तसेच यापूर्वीची बांगलादेशी घुसखोर काढा, ही भूमिका अधिक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

यानंतर राज ठाकरेंना पायी काढलेल्या मोर्चाच्या सभेत बांगलादेशी घुसखोरांविरोधात आवाज उठवला होता. आझाद मैदान आणि सीएसटीसमोरील तोडफोडीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी सभा घेतली होती. त्यातील भूमिका पुन्हा एकदा आक्रमकपणे दिसून येईल, हे देखील यावरून स्पष्ट होत आहे.